महाराष्ट्र
1893
10
पाथर्डी आगार कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षपदी सुनिल कर्नावट
By Admin
पाथर्डी आगार कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षपदी सुनिल कर्नावट
आगार कष्टकरी जनसंघाची कार्यकारिणी जाहीर, सचिवपदी किरण गारुडकर
पाथर्डी- प्रतिनिधी
एस. टी. मधील सर्वात मोठी कर्मचारी संघटना म्हणजे एस. टी. कष्टकरी जनसंघ. अवघ्या एक वर्षात जे वर्षानुवर्षे इतर संघटनेला जमले नाही ते निर्णय ॲड. गुणरत्न सदावर्ते व ॲड.जयश्रीताई पाटील यांनी मान्य करवून घेतले. म्हणूनच अजूनही प्रामाणिक कष्टकरी एकसंध आहे व राहिल. त्याचे सर्व श्रेय एस. टी. कर्मचाऱ्यांचे आधार स्तंभ,संस्थापक मार्गदर्शक अँड. गुणरत्न सदावर्ते व अध्यक्षा अँड. जयश्री पाटील यांचे आहे.
पाथर्डी आगाराच्या कष्टकरी जनसंघाच्या सर्व सदस्यांची नुकतीच वार्षिक बैठक दत्त मंदिर पाथर्डी आगार येथे पार पडली.कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी बाबत, व त्यांच्या अडचणी सोडवणूकी बाबत विशेष चर्चा झाली. त्याबद्दलचा पत्र व्यवहार करून ते पत्र प्रशासनास देण्याचा निर्णय झाला.
वर्षभरात कर्मचाऱ्यांची विविध प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला. सरपंच, कष्टकरी जनसंघाचे केंद्रीय सरचिटणीस, सर्वांचे आधारस्थान दत्ता खेडकर व केंद्रीय सह सरचिटणीस सुभाष खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये
२०२३ -२०३४ या वार्षिक कार्यकारिणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या बहुमताने अध्यक्ष म्हणून सुनिल कर्नावट व सचिव म्हणून किरण गारुडकर,
उपाध्यक्ष किरण दहिफळे, शिवा खेडेकर,संदीप बडे
सहसचिव सतिश बाबर,
बाळासाहेब राठोड,
संभाजी कावरे
कार्याध्यक्ष नितीन खेडकर,खजिनदार नारायण डोळे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत रोडी,देवदत्त अंदुरे,प्रमुख सल्लागार रेवन्नाथ जाधव,
अलोकेशन कमिटी बाबासाहेब गायकवाड,विजय पारेकर,संभाजी आव्हाड.
महिला कमिटी
दिपाली बागडे-महिला अध्यक्ष,मनिषा गिरी- महिला उपाध्यक्ष,
सुनंदा मिसाळ -महिला सचिव,अलका खंडागळे -महिला सहसचिव,कमल जाधव -महिला सहसचिव, अतिरिक्त अधिकार-सचिन खंडागळे.याप्रमाणे कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली.
गेल्या वर्षी नूतन कार्यकारणी असल्याने अध्यक्ष व सचिव यांना
चांगले कार्य करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध झाला नाही, तो त्यांना मिळावा म्हणून त्यांना पुनःश्च संधी द्यावी अशी सर्वांची सूचना होती.पाथर्डी आगारातील सर्व उपस्थित एसटी कष्टकरी जनसंघाचे सर्व पदाधिकारी सभासद यांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात कार्यकारीणी पार पडली.
Tags :

