पाथर्डी तालुक्यात 'या' ठिकाणी अल्पवयीन मुलाचे अपहरण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे.
सध्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आता यात अल्पवयीन मुली व मुलांचे देखील अपहरण करण्याच्या घटना घडत आहेत.
याबाबत अल्पवयीन मुलाचे चुलते संजय भिमराव बडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
गणेश शंकर बडे हा १६ वर्ष ११ महिन्याचा मुलगा घरातून शाळेत जातो असे सांगून घरातून गेला आहे. तो परत आला नाही. गणेश याचा आजूबाजूला, परिसरात, नातेवाईक व त्याचे मित्र यांच्याकडे शोध घेतला.
मात्र तो कोठेही मिळून आला नाही. त्यामुळे त्याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता अपहरण केले आहे. संजय बडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.