सातवाहन राजांच्या नाणेघाटात प्रवेश शुल्क आकारणी सुरु
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसर्ग सौंदर्य असणारे हिंदू क्षत्रिय मराठा सातवाहन राजांचे नाणेघाट याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ पासून शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष आणि सातवाहन राजांचे वंशज आणि वारसदार सुयश शिर्केसातवाहन यांनी दिली.
सातवाहन राजांचा नाणेघाट हा शिवभगवान सातवाहन साम्राज्य संरक्षित स्मारक आहे.
नाणेघाट व जीवधन किल्ला(नाणेघाट) यांचे संवर्धन व जतन करणे तसेच गावात रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
यामध्येनाणेघाटामध्ये या समितीतर्फे पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना आणि माहिती फलक लावले आहेत.
२० ऑगस्ट २०२२ रोजी नाणेघाट परिसरामध्ये (ट्रेकिंग पॉईंट) येथे प्रवेश शुल्काचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी या समितीचे अध्यक्ष सुयश शिर्केसातवाहन आणि इतर सदस्य व स्थानिक गावकरी उपस्थित होते.
यामध्ये प्रवेश शुल्क, पार्किंग शुल्क आकारले जात आहेत.
त्याचबरोबर जे पर्यटक मद्यपान, धूम्रपान, पुरातन वास्तू चे नुकसान करणारे, महिलांची टिंगलटवाळी करणारे यांकडून दंडात्मक शुल्क आकारले जाईल.
असे या समितीकडून पूर्णपणे स्पष्ट करण्यात आले आहे.
या समितीतर्फे सुरक्षा रक्षकांना गणवेश, ओळखपत्र - प्रमाणपत्र आणि इतर साहित्य दिले आहे.
परिसरात दारूबंदी, प्लास्टिक निर्मूलन याविषयी मार्गदर्शन केले आहे.