महाराष्ट्र
Breaking - रस्त्यावर ऊसाच्या बैलगाडीचा- ट्रंक अपघात एक महिला व तीन बैल ठार
By Admin
Breaking - रस्त्यावर ऊसाच्या बैलगाडीचा- ट्रंक अपघात एक महिला व तीन बैल ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ही घटना गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव येथील येसगाव शिवारात साई लॉन समोर घडली.
अज्ञात ट्रकने ऊसतोडणी कामगारांच्या तीन बैल गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात बैलगाडीवरील महिला व तीन बैल जागीच ठार झाले असून एक पुरुष व एक महिला असे दोघेजण व दोन बैल जखमी झाले आहेत.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा ऊस तोडणी कामगारांच्या सात गाड्यां येसगाव नाटेगाव शिवारातील ऊस तोडणी करण्यासाठी गुरुवारी पहाटे बैलगाड्या घेऊन जात होत्या, दरम्यान सहा वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील येसगाव शिवारातील साई लॉन समोर भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने लागोपाठ तीन बैलगाडयांना जोराची धडक दिली. क्षणात होत्याचे नव्हते झाले, या अपघातात ऊस तोडणी महिला कामगार मोनाबाई दादाजी पवार (२७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दादा अकडू पवार व कल्याबाई सुभाष अहिरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाईकवाडे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमध्ये तीन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन बैलही जखमी झाले.
सदर घटनेची माहिती समजताच अमृत संजीवनीचे ट्रान्सपोर्ट अधिकारी केशवराव होन घटनास्थळी हजर झाले. केशवराव होन यांनी सदर घटनेची माहिती कारखान्याचे सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, शिंदे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, जनरल मॅनेजर औताडे यांना भ्रमणध्वनीवरून दिली.
अपघातानंतर ट्रक निघून गेला असला तरी हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मालेगाव येथील केदा भिवसेन पाटील या मुकादमाची ऊस तोडणी कामगारांची टायर बैलगाडीची ही गॅंग आहे. दुर्घटनेत मयत झालेल्या मोनाबाई पवार शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर जखमीना कोपरगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ कोळपे व श्रीमती श्रद्धा काटे यांनी बैलांचे शवविच्छेदन केले. तर जखमी बैलावर उपचार केले. कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहे.
कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड, हवालदार अशोक आंधळे हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले.
Tags :
29059
10