गुहा फाटा- भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर - मनमाड महामार्गावरील राहुरी तालुक्यातील गुहा फाटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात एक पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास नगर सटाणा ही बस नगरहून शिर्डीकडे जात होती. तर, मध्य प्रदेशातील महिंद्रा गाडी क्र. एमपी 10 सीबी 1236 ही पुण्याकडे चालली असताना नगर - मनमाड राज्य महामार्गावर गुहा फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की चारचाकी गाडी चक्काचूर झाली. या गाडीतील चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे, परंतु, वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील एक कुटुंब शिर्डीमध्ये दर्शनासाठी आले होते. शिर्डीत दर्शन घेऊन शनि शिंगाणापूरला हे कुटुंब कारने चालले होते. त्यावेळी ही घटना घडली.
शिर्डीहून शनीशिंगणापूरला जाणाऱ्या गाडीला हा अपघात झाला आहे, नगरहून सटाण्याला जाणऱ्या कारला बसने उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, या गाडीचा चक्काचूर झाला. घटनास्थळावरच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्याच दरम्यान दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हे सर्व जण एकाच कुटुंबातले होते.