महाराष्ट्र
अलीकडे कुणी तरी बाहेर येतो आणि भोंगे बंद करा म्हणतो. त्यांना हे आताच का सूचलं?- अजित पवार
By Admin
अलीकडे कुणी तरी बाहेर येतो आणि भोंगे बंद करा म्हणतो. त्यांना हे आताच का सूचलं?- अजित पवार
मी शब्दाचा पक्का, शब्द कधीही फिरवत नाही; घोडा मैदान दूर नाही,
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिर्डीच्या कार्यक्रमात त्यांच्या कानात काही तरी सांगू पाहणारे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांनी चार वेळा हात जोडून नकार दिला.
शिर्डीत पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीचं उद्घाटन तर कोपगावमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डी व कोपरगावच्या दौऱ्यावर होते. आपल्या खास शैलीत त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं तसेच मताधिक्याच्या मुद्द्यावरून कोपरगावच्या मतदारांनाही आहान दिलं.
राष्ट्रवादीचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबतच भाजपचे खासदार डॉ. विखे आणि शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हाही कार्यक्रमाला उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील आजनसंबंधीच्या भोंग्याच्या मुद्यावरू सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर ठाकरे यांचं नाव न घेता पवारांनी टीका केली.
अलीकडे कुणी तरी बाहेर येतो आणि भोंगे बंद करा म्हणतो. त्यांना हे आताच का सूचलं? यापूर्वी सरकारमध्ये त्यांचं कोणी नव्हतं का? तेव्हा झोपले होते का? आरं बाबा बोलणं सोपंय, पण आपण काय सांगतोय, त्याचे काय परिणाम होतील, हे पण पाहिलं पाहिजे ना,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना फटकारले.
आम्ही कामं करतो तुम्ही मतं द्या, असा सांगत ते म्हणाले, “आम्ही काही साधू-संत नाही, माणसंच आहोत. आम्ही कामं करतो, तुम्ही मताधिक्य द्या. घोडा मैदान जवळच आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसेलच तुम्ही काय करता ते. आम्ही मात्र शब्दाचे पक्के आहोत. आता सांगितलेली कामं नाही केली, तर पवारांची औलाद सांगणार नाही,’ असं पवार म्हणाले.
शिर्डीच्या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं भाषण सुरु असताना डॉ. विखे पाटील आपल्या खुर्चीवरुन उठून दोन चारखुर्च्यांपलीकडं बसलेल्या अजित पवार यांच्या पाठीमागं जाऊन त्यांच्या कानात काही तरी सांगू लागले.
मी शब्दाचा पक्का आहे. शब्द कधी फिरवत नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राजकीय, सामाजिक चळवळीत नगर जिल्ह्याच योगदान आहे. 1991 साली लोकसभा निवडणुकीत शंकरराव काळे खासदार झाले, तेव्हा मी ही खासदार झालो. मला 6 महिने कालावधी मिळाला. पी व्ही नरसिंहराव यांनी मला सांगितले की अवसिश्वास ठरवानंतर तू राजिनामा द्यायचा, शरद पवार तुझ्या जागी खासदार होतील हा किस्सा देखील अजित पवार यांनी सांगितला. आता काही लोक भाषण करत समाजात तेढ निर्माण करत आहेत. इतके दिवस काय झोपले होते का? असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.
शंकरराव काळे यांच्या 101 वी जयंतीच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. आम्ही कितीही राज्यभर गप्पा मारत असलो तरी आमचे मतदारसंघ सोडून जात नाही. मात्र, शंकरराव काळे अनेक ठिकाणी निवडून आले असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात असताना राज्य सरकारने अनेक विकासकामे केली असल्याचे अजित पवार म्हणाले. सावकाराच्या दारात जायचे नाही, शुन्य टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळतील असेही पवार म्हणाले.
आशुतोष काळे यांना विधिमंडळ मध्ये पाठवले, याबाबत तुमचे आभार मानतो असेही अजित पवार म्हणाले. दोन वर्षे कडक निर्बंध होते, त्यामुळे कार्यक्रम घेतले नाहीत. मास्क ऐच्छिक आहेत. बंधनकारक नाही, मात्र आमचे टास्क फोर्स लक्ष ठेवून आहे असेही पवार म्हणाले. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात ते पुन्हा पूर्ववत आणायचे आहे. अर्थसंकल्पात कुठलाही नवा टॅक्स लावला नाही. रस्ते, विकास कामासाठी निधी राखीव ठेवला आहे. पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे, पाणी वापराचा क्रम जाहीर केला आहे. सर्व विकासकामे करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. मी शब्दाचा पक्का आहे, शब्द कधी फिरवत नाही असेही अजित पवार म्हणाले.
आम्ही लाख लाख मतांनी विजयी होतो मात्र यंदा आम्ही कसेबसे निवडून आलो. आम्ही साधू संत नाही, पुडच्या वेळी जास्त मतांनी निवडून आणा असेही अजित पवार म्हणाले. घोडा मैदान दूर नाही, जिल्हा परिषद निवडूक जवळ आहे, तेव्हा दाखवा असेही अजित पवार म्हणाले.
Tags :
487
10