महाराष्ट्र
अष्टभैरवनाथ यात्रेचा उत्सव सलग तीन दिवस चालतो- सरपंच भावना पालवे
By Admin
अष्टभैरवनाथ यात्रेचा उत्सव सलग तीन दिवस चालतो- सरपंच भावना पालवे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी गावाचे ग्रामदैवत जागृत देवस्थान अष्ट भैरवनाथांचा यात्रा उत्सव कोरोना असल्याने मागील दोन वर्षापासून होऊ शकला नाही, मात्र यावर्षी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडल्याचे सरपंच भावना अविनाश पालवे यांनी सांगितले.
शिरसाटवाडी गाव हे सुमारे पाचशे कुटुंबाचे असुन गावात सुमारे चार हजारांच्या घरात लोखसंख्या असून प्रत्येक कुटुंबीय देवस्थानच्या यात्रेसाठी आवर्जून वर्गणी देतात. गावातील अनेक भूमिपुत्र राज्यासह राज्याच्या बाहेर विविध भागात नॊकरी व कामानिमित्त आपल्या कुटुंबासह बाहेर स्थायिक झाले असुन अष्टभैरवनाथांच्या यात्रेला आपल्या श्रद्धेपोटी आवर्जून येतात. गावातील ग्रामस्थांची मोठी श्रद्धा अष्टभैरवनाथावर आहे. भाविकांच्या अडचणीत भैरवनाथ महाराज आपल्या मागे कोणत्याना कोणत्या रूपाने उभा राहतो, अशी भावना लोकांमध्ये आहे. तीन दिवस यात्रा उत्सव चालतो. पहिल्या दिवशी कावडी मिरवणूक , दुसऱ्या दिवशी मुर्तीला जलाभिषेक , रात्री पालखी सोहळा व छबिना मिरवणूक त्यानंतर तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवून विविध जिल्ह्यातून आलेल्या पैलवानांच्या कुस्त्या लावून हजारोंचे रोख स्वरूपात बक्षीस यात्रा कमिटीच्या माध्यमातून दिले जातात.
तसेच यात्रा कालावधीत करमणूक म्हणून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात्रेमधे खेळण्यांचे व खाऊंची दुकाने लावले जातात. यात्रेच्या माध्यमातून सर्व गाव एक होऊन ग्रामस्थ यादिवशी एकत्रित राहण्याचा आनंद घेतात, असे सरपंच भावना पालवे यांनी सांगितले.
यात्रा उत्सवासाठी मा. जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव शिरसाट , मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे , पोपटराव पालवे , गोरख मेजर शिरसाट , किशोर मेजर शिरसाट , बाबाजी मेजर शिरसाट , शहाराम फुंदे , देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय शिरसाट , सचिव जनार्धन शिरसाट , उपसरपंच किशोर सानप , ग्रामपंचायत सदस्य अंकुश शिरसाट , संदीप शिरसाट , भानुदास मेजर शिरसाट , बंडु शिरसाट , अनंतराजे कराड , पप्पू शिरसाट , नारायण सानप , पै. सचिन शिरसाट , भाऊसाहेब शिरसाट , ज्ञानदेव माऊली कोंगे , महेंद्र शिरसाट , चंद्रकांत शिरसाट , सोमनाथ दिनकर , विक्रम शिरसाट , विक्रम शेकडे , सुभाष शेकडे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी , ट्रस्ट व यात्रा कमिटीने हा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले.
Tags :
461
10