महाराष्ट्र
स्वर्गीय मा. आमदार राजीव राजळे यांना अभिवादन
By Admin
स्वर्गीय मा. आमदार राजीव राजळे यांना अभिवादन
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत आमदार राजीव राजळे यांचे पाचवे पुण्यस्मरण निमित्त स्मृतीवंदन कार्यक्रम व व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी स्व. आ. राजीव राजळे यांना अभिवादन केले व प्रास्ताविकातून महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, पारनेर या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व अहमदनगर जिल्हा करिअर कटटा समन्वयक प्रा. नितीन निपुंगे यांनी 'युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअरचे मार्ग' या विषयावर मार्गदर्शन करतांना यशापयश हा जीवनाचा एक भाग असून त्याचा स्वीकार करत ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्वयंप्रेरणेने कोणत्याही क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व अतिशय माफक दरात उपलब्ध असलेल्या करियर कट्टा या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी आव्हानांना संधी समजून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडविल्याशिवाय यश मिळवणे अशक्य आहे. आपली ग्रामीण पार्श्वभूमी लक्षात ठेवून सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास म्हस्के यांनी आपला विद्यार्थी जर प्रशासकीय अधिकारी झाला तर तो ग्रामीण जीवनातील समस्यांची सोडवणूक अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे गांभीर्याने बघत यशस्वी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे , संचालक सुभाषराव ताठे, बाबासाहेब
किलबिले, नारायणराव काकडे, श्रीकांत मिसाळ, बाळासाहेब गोल्हार,कुशिनाथ बर्डे, महादेव जायभाये, भाजपाचे तालुका अध्यक्ष माणिकराव खेडकर ,पंचायत समिती सदस्य सुनील आहोळ,श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक जे. आर. पवार तसेच राजु साप्ते, भगवान साठे व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. अतुलकुमार चौरपगार यांनी मानले.
Tags :
4238
10