दादापाटील राजळे महाविद्यालयाचा बारावी विज्ञान व वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल
निकालाची परंपरा कायम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाचा मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला असून कला शाखेचा निकाल ९८% टक्के लागला आहे. विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक वेदांत आप्पासाहेब सातपुते ८९.६७% , द्वितीय क्रमांक कु. चितळे सोनाली दादासाहेब ८७.१७% तृतीय क्रमांक सोनवणे सुरज कैलास ८४.८३% गुण मिळाले. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक कांबळे ज्योती दीपक ८०% द्वितीय क्रमांक म्हस्के ओंकार राजेंद्र ७२.१७% तर तृतीय क्रमांक दगडखैर रूपाली सुरेश ६६.८३% गुण मिळाले. कला शाखेत प्रथम क्रमांक कु.बारवेकर गीतांजली नंदकिशोर ८०.८३% द्वितीय क्रमांक कु.आमटे अंकिता पोपट ७९% तर तृतीय क्रमांक कु.आमटे सोनाली शत्रुघ्न ७८.५०% गुण मिळाले.या सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनींचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजळे, विश्वस्त मा. राहुल राजळे,सचिव मा.आर.जे.महाजन, मा.शिवाजीराव राजळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर , कार्यालयीन अधिक्षक श्री विक्रमराव राजळे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. शाम गरड, प्रा.अशोक काळे प्रा.राजेंद्र इंगळे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.