महाराष्ट्र
डीजिटल सातबारा Digitally Signed 7/12 : राज्य शासनाकडून सातबारामध्ये 11 बदल, कसा असेल Online 7/12
By Admin
डीजिटल सातबारा Digitally Signed 7/12 : राज्य शासनाकडून सातबारामध्ये 11 बदल, कसा असेल Online 7/12
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य शासनाच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात 11 बदल केले आहेत. मागच्या 50 वर्षात सातबारा उताऱ्यांमध्ये बदल झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
1 ऑगस्ट 2021 पासून शेतकऱ्यांना हा सातबारा मिळणार आहे. याचबरोबर आता सामान्यांना सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा तो ही तलाठ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह मिळणार आहे. या सातबाऱ्याचा वापर सरकारी कामासाठी ही होणार असल्याने तो कुठेही चालणार आहे. (Digitally Signed 7/12) डिजिटल सातबारा काढण्याची पद्धत जाणून घ्या? (How to Get Digital Satbara) सातबारा काढण्यासाठी सगळ्यात गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 हा पर्याय दिसेल. यावर तुम्ही क्लिक केल्यास 'आपला 7/12' नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर दिसेल. तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही माहिती घेऊ शकता. पण, पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी वेबसाईट ओपन केला असाल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढण्याची सोय उपलब्ध आहे.
त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर Enter Mobile Number च्या खालच्या चौकटीत तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा. एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज येईल. त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर एक आपला सातबारा नावानं नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे पर्याय दिसतील. यातल्या Digitally signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा' असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यासाठी तुम्हाला 15 रुपये देऊन हा सातबारा मिळणार आहे. आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे.
यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड म्हणायचं आहे. त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.
Tags :
312
10