जावई घरी आला ; सासरा अन् मेहुण्याने केली धुलाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जावयास सासरी किती मान असतो हे सांगणे न लगे. परंतु बऱ्याचदा अशा काही घटना घडतात की ज्याने या नात्यास गालबोट लागलं जात. त्यामागे करणेही तशीच असतात हा भाग वेगळा. अशीच काहीशी घटना साताऱ्याचा जावई पत्नीला आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे आला असता घडली आहे.
या जावयाची सासरा आणि मेहुण्याने यथेच्छ धुलाई केली आहे. पण हे प्रकरण एवढ्यावरच नाही थांबले. त्यानंतर जावयाने या दोघांवर कारवाई करण्यासाठी साताऱ्यातील पोलीस मुख्यालयासमोर युवकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. नवनाथ अशोक महापुरे (वय ३२, रा. मल्हार पेठ, सातारा) असे सदर इसमाचे नाव आहे.
समजलेली माहिती अशी : नवनाथ महापुरे हा शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बाटलीतून पेट्रोल घेऊन पोलीस मुख्यालयासमोर आला. त्याने हातातील पेट्रोल अंगावर ओतले. परंतु तेथील पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्याकडे पोलिसांनी या प्रकाराबद्दल चौकशी केली असता त्याने त्याच्याबाबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.
नवनाथची पत्नी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे काही दिवसांपूर्वी गेली आहे. तिला आणण्यासाठी तो श्रीगोंदा येथे गेला होता. त्यावेळी त्याचा मेहुणा महावीर गायकवाड व सासरे सर्जेराव गायकवाड यांनी त्याला मारहाण केली.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस नाईक राहुल खाडे यांनी रविवारी रात्री नवनाथ महापुरेच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.