महाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदाराचा दशक्रिया विधी
By Admin
पाथर्डी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदाराचा दशक्रिया विधी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात गेली ७ वर्षापासून रखडलेल्या निर्मळ नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम पूर्ण होत नसल्याने प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तसेच आंदोलने करून देखील प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा दशक्रिया विधी घालून अनोखे आंदोलन केले.
मेहकरी ते फुंदेटाकळी दरम्यान निर्मळ नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या ७ वर्षापासून अर्धवट अवस्थेत असून रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रवाश्यांना दैनदिन अपघातांना सामोरे जावे लागत आहे.मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग अथवा या कामाचा ठेकेदार काहीच प्रगती करत नसल्याने शेकडो अपघात झालेले आहे सर्व जबाबदार लोकप्रतिनिधी यांचा यावेळी आंदोलकांनी निषेध नोंदवला.
श्रद्धांजली सभेत आंदोलकांनी आमदार मोनिकाताई राजळे, खासदार सुजय विखे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टिका करत महामार्ग काम मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी रखडलेला महामार्ग काम पूर्ण होण्यासाठी आम्ही खुप वेळा अंदोलने केली न्यायालयातही गेलोत.तेथे अधिकारी चुकीच्या पद्धतीने माहीती देत आहेत.आता अधिकारी व लोकप्रतनिधी यांच्यातील युती तोडण्याचे काम करु यापुढील काळात अपघात झाला तर त्याची जबाबदारी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर निश्चीत करण्यात यावी,काम वेळेत पुर्ण झाले असते तर अपघात झाले नसते व लोकांचा बळी गेला नसता,आता तरी काम पुर्ण करा असे किसन आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
लोकप्रतिनधी म्हणुन आमदार मोनिकाताई राजळे व खासदार सुजय विखे यांची रस्त्याचे काम मार्गी लावण्याची जबाबदारी होती. त्यांनी बैठका घेवुन रस्त्याचे काम पुर्ण करण्याबाबत वेळोवेळी सांगितले.अजुन किती अपघात झाले पाहीजेत म्हणजे हे काम पुर्ण होईल.केंद्र व राज्य सरकारने या कामासाठी निधी देवुन तातडीने ते पुर्ण करावे असे शिवशंकर राजळे यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी ह.भ.प.आदीनाथ आंधळे महाराज यांचे प्रबोधनात्मक प्रवचन झाले.तर सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी मुंडन केले तर प्राध्यापक सुनील पाखरे यांनी पिंड दान केले.
यावेळी किसन आव्हाड,सुनील पाखरे,अॅड.हरिहर गर्जे,गोरक्ष ढाकणे,सोमनाथ बोरुडे,अविनाश टकले,प्रा.अशोक व्यवहारे,नागनाथ गर्जे,बाळासाहेबांची शिवसेना गट तालुका प्रमुख विष्णू ढाकणे,येळीचे सरपंच संजय बडे,संतोष दहिफळे,आय.कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,मा.नगरसेवक बंडू बोरुडे,वंचीत आघाडीचे अरविंद सोनटक्के,दिगंबर गाडे,सीताराम बोरुडे,अॅड.दिनकर पालवे,अविनाश फुंदे,राजू बडे,सलमान पठाण,सचिन नागपुरे,जालिंदर शिरसाट, रामकिसन शिरसाठ,सुकदेव मर्दाने,अविनाश पालवे,संतोष जिरेसाळ,योगेश गोल्हार,दादा फुंदे,बद्रीनाथ फुंदे,अर्जुन फुंदे,सतीश गर्जे,राजू बोरुडे,भास्कर दराडे,नवनाथ चव्हाण,बाबासाहेब ढाकणे,विजय बोरुडे,तुकाराम पवार,विनायक चौधरी,कृष्णा पांचाल,दिलीप काटे,कासम शेख,भागवत चेमटे,जालिंदर काटे,शैलेन्द्र जायभाय आदी सह मोठ्या संखेने आंदोलक उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता स्मिता पवार यांच्यावर संतप्त आंदोलकांनी प्रश्नाचा भडीमार केला, अधिग्रहणाचा प्रश्न मिटल्या नंतर महामार्गाचे काम मार्गी लागेल तसेच येत्या ३० तारखे पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलकांनी तात्पुरत्या स्वरुपात आंदोलन स्थगित केले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सहकार्यासह पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
रखडलेल्या महामार्ग विभागाच्या पिंडाला काकस्पर्श –
आंदोलकांनी गांधीगिरी मार्गाने विधिवत महामार्ग विभागाच्या निष्क्रीय पणाचा दशक्रिया विधी घालत पिंडदान केले यावेळी कावळ्याने तात्काळ पिंडग्रहण करत काक स्पर्श केला,त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी चर्चा उपस्थिता मध्ये रंगली होती.
Tags :
963
10