श्री क्षेत्र भगवानगडावर दसरा मेळाव्यास परवानगी मिळावी- राजाभाऊ दगडखैर
पाथर्डी- प्रतिनिधी
राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या बीड जिल्ह्याच्या सीमेलगत व अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र भगवानगड हे काही दिवसांवर आलेल्या नवरात्री उत्सवामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांसाठी भगवानगड दसरा मेळाव्यास शासकीय परवानगी द्यावी, अशी मागणी पाथर्डी तहसीलदार व पोलीस ठाणे यांच्याकडे राजाभाऊ दगडखैर व सुनिल पाखरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, श्री क्षेत्र भगवानगड पारंपारिक दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने कळविण्यात येते की, श्री राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न महायोगी भगवानबाबा यांनी प्रारंभीत केलेला दसरा मेळावा पारंपारिक जागेवर अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी भगवान बाबांचे असंख्यभक्त व भगवानगड दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने दसरा मेळावा दि.०५/१०/२०२२ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सदर या मेळाव्यास शासकीय परवानगी देण्यात यावी. मेळाव्यास परवानगी देऊन निगडित असणाऱ्या आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा आपल्या अखतारित असणाऱ्या आपल्या सर्व प्रशासकीय विभागाला लेखी आदेश करून सूचना करण्यात याव्यात. भगवान बाबांच्या भक्तांचा मान सन्मान राखत व पारंपारिक दसरा मेळाव्याची अखंडितपणे चाललेली पार्श्वभूमी पाहता परवानगी देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.