पाथर्डी - 'या' गावात शेत तळ्याच्या पाय घसरुन शिक्षकेचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेततळ्यात पडून एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली. मनीषा महादेव मरकड (वय 49) असे या शिक्षिकेचे नाव आहे.
मनीषा मरकड या निवडुंगे गावाजवळ असलेल्या परिसरात नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेल्या होत्या. या परिसरात असलेल्या एका शेततळ्यात पाय घसरून पडून त्यांचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
शनिवारी संध्याकाळी उशिरा त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. मरकड या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित येळी येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. रविवारी (दि.10) सकाळी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.