प्रांताधिकार्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील मेढे कुटुंबीयांवर काही अधिकार्यांनी जाणीवपूर्वक अन्याय केला असून या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ढोरजळगाव येथील आलेश मनोहर मेढे यांच्या जमिनीच्या वादाचा निर्णय प्रांताधिकारी व अप्पर जिल्हाधिकार्यांनी मेढे यांच्या बाजूने देत या निर्णयाची अंमलबजावणी ढोरजळगावचे तलाठी व मंडलाधिकार्यांनी करावी, असे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अरविंद सोनटक्के, प्यारेलाल शेख, रवींद्र उर्फ भोरू म्हस्के, रोहिणी ठोंबरे, सुनिता जाधव, सौरभ काकडे, लक्ष्मण मोरे, रवींद्र नीळ, विष्णू वाघमारे, सोपान भिंगारे, रवींद्र सर्जे, सुरेश जाधव, अजय फुंदे, संजय कांबळे व मेढे कुटुंबीयांनी आंदोलन केले.