महाराष्ट्र
पाथर्डीत शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा
By Admin
पाथर्डीत शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
शिवसेना प्रणित दलित महाआघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन शिवसेना प्रणित दलित महाआघाडीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम सरसेनापती हिदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना प्रणित दलित महाआघाडीचे संस्थापक तथा अध्यक्ष अंबादास आरोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेला वंदन करण्यात आले. यावेळेस पुष्पहार अर्पण करतांना दलित महाआघाडीचे पदाधिकारी बाळासाहेब कांबळे, मधुकर धावड, सनी दिनकर, अतुल पटारे, कांताबाई पटेकर, वनिता पटेकर, गोरक्ष चन्ने, साईनाथ पाचरणे, भाऊसाहेब मर्दाने, शिवसेना नेते विष्णुपंत पवार, नवनाथ चव्हाण, सचिन नागापुरे, नवनाथ ऊगलमुगले, भानुदास गाडे, अशोक शिंदे, रविंद्र मिरपगार, दिनकर खंडागळे, गोरक्ष मरकड, माणिक रोकडे,मकरंद कुलकर्णी, गणेश फुलमाळी व दलित महाआघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब कांबळे, मधुकर धावड, विष्णुपंत पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय भाषणात शिवसेनेच्या ५६ वा वर्धापन दिना निमित्ताने शिवसेना प्रणित दलित महाआघाडीच्या वतीने समस्त महाराष्ट्रातील दलित बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेनेचे कार्य हे तळागाळातील राहणाऱ्या समाजापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी हे सर्व शिवसैनिकांची आहे, असे प्रतिपादन शिवसेना प्रणित दलित महाआघाडीचे संस्थापक, अध्यक्ष अंबादास आरोळे यांनी केले.आज महाराष्ट्र राज्यात उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन काम पहात आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना प्रणित दलित महाआघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल तसेच पुढच्या काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी आम्ही महाराष्ट्रभर काम करू, अशी ग्वाही अंबादास आरोळे यांनी दीली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन नागापुरे यांनी केले तर आभार मधुकर धावड यांनी मानले.
Tags :
41560
10