महाराष्ट्र
मोटारसायकल चोरी करणारी ; आंतरजिल्हा टोळी जेरबंद
By Admin
मोटारसायकल चोरी करणारी ; आंतरजिल्हा टोळी जेरबंद
पाथर्डी, संगमनेर, अकोले येथे त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री केल्याची माहीती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट एक , शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 मोटरसायकल या टोळीकडून जप्त केल्या आहेत. चाकण एमआयडीसी मधून चोरी केलेल्या दुचाकीवरून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
युनिट एक हे पोलीस पथक आरोपींच्या मागावर असताना एका मोटार सायकलवरून तीन व्यक्ती संशयीतरित्या खेड कडून येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांनी शिताफिने पकडले. या कारवाईत प्रज्वल प्रताप देशमुख (वय - 20 वर्षे ) आणि अक्षय लहानु जाधव (वय - 27 वर्षे, दोघेही रा.
संगमनेर) या दोन दुचाकी चोरांना अटक केली, तर तिसऱ्याला पडण्यात अपयश आले.
युनिट 1 पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेली मोटार सायकल त्यांनी चाकण एमआयडीसी येथील महाळुंगे परीसरातुन चोरी केल्याचे सांगितले. याप्रकरणी आणखी तपास केल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड, चाकण, खेड, महाळुंगे व पुणे ग्रामीण या परिसरातून मोटार सायकल चोरी करून त्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी, अकोले येथे त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली. यातील आरोपी हे संगमनेर येथून मोटार सायकल वरून पुणे नाशिक रोडवरील चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळेफाटा परिसरात येऊन मोटार सायकल चोरी करून रातोरात परत जात असत आणि चोरलेल्या मोटार सायकल या परिचीत लोकांना कागदपत्र नंतर देतो असे अश्वासन देत तात्काळ विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
आरोपींकडून एकूण 9 लाख 45 हजार रुपयांच्या 17 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये चाकण पोलीस ठाण्यात 7 गुन्हे, नारायणगाव पोलीस स्टेशन चे 2 गुन्हे आणि नाशिक भागातील 3 गुन्हे दाखल झाले आहेत.
Tags :
83281
10