महाराष्ट्र
राष्ट्रवादी कामगार सेलचे ठिय्या आंदोलनाचा दणका
By Admin
राष्ट्रवादी कामगार सेलचे ठिय्या आंदोलनाचा दणका
कामगार आयुक्त कार्यालयातील कामकाज सुरळीत, कामगारांना साहित्याचे वाटप
पाथर्डी- प्रतिनिधी
मागील आठवड्यात नगर येथील महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व जिल्हा कामगार सुविधा केंद्राचे कार्यालयात अनागोंदी कारभाराविरोधात राष्ट्रवादी कामगार सेलचे वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्याचा धसका प्रशासनाने घेतला होता त्याचा मोठा सकारात्मक परिणाम होऊन तेथील कामकाज सुरळीत झाले आहे व शासनाकडून कामगारांना मिळणारे साहित्याचे वाटपही सुरळीतपणे सुरू झाले.
यावेळी भिमाबाई गाडेकर,सुनिता साबळे,रेणुका नांगरे वर्षा होंडे, साखरबाई वांढेकर,वंदना मराठे मंदा गायकवाड मनिषा गायकवाड सुमण गव्हाणे वषैली कदम,सुधीर ढवळे,सचिन भुजबळ,वसंत काळे अक्षय शिंदे ,निता कदम, युवा नेते अमोल वांढेकर,अशोक गव्हाणे ,दत्तात्रय थोरात, रामभाऊ वांढेकर यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले कामगार उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देताना राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा संघटक सचिन होंडे म्हणाले की, या कार्यालया मध्ये जिल्ह्यातून कामगार मोठ्या संख्येने विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी येत असतात. येथे लाभार्थी कार्ड व बांधकाम साहित्य किट देण्यात येते परंतु कार्यालयामध्ये कार्ड व बांधकाम साहित्य किट उपलब्ध नसल्याने तेथे येणाऱ्या कामगारांना चकरा माराव्या लागत होत्या. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर सामाजिक न्याय विभागाचे चे निलेश बांगरे कामगार जिल्हा उपाध्यक्ष वैभव म्हस्के, जिल्हा कामगार सेलचे कार्याध्यक्ष विशाल म्हस्के राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा संघटक सचिन होंडे आधीसह बांधकाम कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा प्रशासनाने धसका घेत या कार्यालयातील कामकाजात सुधारणा झाली व कामगारांना आपल्या न्याय हक्काचे शासन अनुदानित कामगार साहित्यही मिळाले. त्याचे वाटप आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आले. कामगार कल्याणकारी मंडळा तर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असून मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडे आपले नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हाभरातून कामगार येतात. नोंदणी केल्यानंतर त्यांना ओळखपत्र दिले जाते व ते ओळखपत्र घेण्यासाठी बोलावून देखील ओळखपत्र आले नाही असे सांगून कामगाराला हेलपाटे मारावे लागत होते. राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आंदोलन करत सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवळे यांची भेट घेऊन होत असलेली कामगारांची पिळवणूक व चाललेला अनागोंदी कारभार दाखवत तो सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम झाला असून कामगारांना याचा मोठा फायदा होत आहे.
Tags :
589
10