महाराष्ट्र
विश्वविनायक उद्योग समूहाला मुंबई येथील महाराष्ट्र बिझनेस आयकॉन पुरस्कार
By Admin
विश्वविनायक उद्योग समूहाला मुंबई येथील महाराष्ट्र बिझनेस आयकॉन पुरस्कार
पाथर्डीत मोदक शहाणे यांचा उद्योग समूह पदाधिकार्यांच्या वतीने सन्मान
पाथर्डी- प्रतिनिधी
पारंपारिक सराफ व्यवसायासह शहर व तालुका परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ मिळावे,यासाठी विश्वविनायक बँकेची स्थापना केली.तसेच विश्वविनायक मंगल कार्यालय देखील उभारण्यात आले.आगामी काळात देखील विश्वविनायक उद्योग समूह विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यशील राहून सर्वसामान्यांना मदतीचा हात देईल, असे प्रतिपादन विश्वविनायक उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष मोदक शहाणे यांनी केले.
शहरातील प्रसिद्ध उद्योजक व विश्र्वविनायक उद्योग समूहाचे संस्थापक मोदक प्रभाकर शहाणे यांना मुंबई येथील रिसिल या संस्थेमार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र बिझनेस आयकॉन २०२२ हा उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
मोदक शहाणे हे पाथर्डी शहरातील प्रतिष्ठित सराफ व्यापारी असून नीलप्रभा ज्वेलर्स ते संचालक आहेत.विश्वविनायक उदयोग समुहाला मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.विश्वविनायक उद्योग समुहातील निलप्रभा ज्वेलर्स,विश्वविनायक निधी,विश्वविनायक मंगल कार्यालय या उद्योगात केलेल्या सामाजिक व आर्थिक उपक्रमाची दखल म्हणुन हा पुरस्कार देण्यात आला आहे.याचे वितरण नाशिक येथे प्रसिध्द सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.मोदक शहाणे यांनी अतिशय तरुण वयात विविध क्षेत्रांमध्ये धाडसाने पाऊल टाकीत उत्तुंग यश संपादन केले.विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत सर्व सामान्यांना सेवा देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला.त्यांचे हे यश व पुरस्कार तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.मोदक शहाणे यांनी अल्पावधीतच मिळवलेल्या यशाची,त्यांच्या उद्योग,व्यापार व सामाजिक कार्याची उचीत दखल घेत त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विश्वविनायक उद्योगसमूहाच्या पदाधिकार्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी महेश पठाडे,प्रविण शेळके,शंकर शिरसाठ,देवेंद्र खाटेर,ओम टाक,दिपक शेळके,अनिल काळे,सुरेंद्र देवढे, हरिदास पठाडे,पांडुरंग बेद्रे,परमेश्वर टकले,योगेश शिंदे,जुनेद आतार,अंबादास घुले,नंदकिशोर खोले,सोनवणे,श्रुती शहाणे आदि उपस्थित होते.
Tags :
41420
10