भालगाव सहकारी सेवा सोसायटी वर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विद्यमान सरपंच डॉ. मनोरमा खेडकर व भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांच्या परिवर्तन शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १२ जागांवर विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार मोठ्या उत्साहात केला. विरोधातील मच्छिंद्रनाथ शेतकरी विकास पॅनलला फक्त एक जागा मिळाली.
भालगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत डॉ. मनोरमा खेडकर व माणिकराव खेडकर यांचे परिवर्तन शेतकरी विकास पॅनल आमने सामने होते. यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनलचे १२ उमेदवार विजयी होऊन सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले.
विजयी उमेदवारात रावसाहेब खेडकर, अशोक खेडकर, रामदास खेडकर, भिमराव कासुळे, तुकाराम खेडकर, अर्जुन खेडकर, रामनाथ सुपेकर, कैलास फुंदे, आशाबाई खेडकर, छाया सुपेकर, विठ्ठल बनसोडे, जगन्नाथ गाढे, साधू रोकडे यांचा समावेश आहे. निवडणुकीचा निकाल वाय. एल. नरसिंगपूरकर यांनी जाहीर केला.
सुरेश खेडकर यांचा गट माजी सरपंच अंकुश कासुळे यांच्या गटात सामील झाल्याने निवडणूक रंगतदार झाली होती.
येथील ग्रामपंचायत निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असून सोसायटीची निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीची नांदी ठरली होती. त्यामुळे दोन्ही गटाने प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.