महाराष्ट्र
मृदा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
By Admin
मृदा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक म्हणजे शुक्रवारी रात्री 9:45 च्या सुमारास मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर लोहगाव शिवारात गोळीबार झाला होता, या पार्श्वभूमीवर मंत्री गडाख यांच्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. जी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे त्यात दोन व्यक्ती फोनवर सांभाषण करत आहेत त्यातील एक व्यक्ती आपल्याकडे अशी काही माणसं आहेत ज्यांना सांगितले तर शंकररावला घरात जाऊन ठोकतील अशा आशयाचे सांभाषण आहे. तर राहुल राजळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रतिक्रिया देताना राहुल राजळे यांच्यावरील हल्ला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे, मागील काही दिवसांपासून माझ्याबाबत आणि माझ्या कुटुंबियांबाबत शिवराळ भाषेत टीका होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल राजळे यांच्यावरील हल्ला म्हणजे माझ्यावरील हल्ला आहे असं गडाख म्हणाले.
मागील काही दिवसांपासून नेवासा तालुक्यातील राजकारण अतिशय खालच्या पातळीवर घसरले असून हे दुर्दैवी आहे. पण माझा पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. राहुल राजळे यांची प्रकृती चिंताजनक दरम्यान राहुल राजळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती आहे. राहुल राजळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांचे भाऊ विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून नितीन शिरसाठ ,बबलू लोंढे , संतोष भिंगारदिवे आणि अन्य दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली असून, लवकरच इतरही आरोपींना अटक केली जाईल असं त्यांनी म्हटले आहे.यासाठी एक विशेष पोलीस पथक देखील तयार करण्यात आलं आहे.
शिवराळ भाषेचा वापर
गडाख पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात खोट्या-नाट्या केस दाखल करून आरोप करण्याचे प्रकार सुरू आहेत. माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते. नेवासा तालुक्यातील राजकारण खालच्या स्थरावर चालले आहे. मात्र, मला पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. ते नक्कीच आरोपींना शोधून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आधी हल्ला आणि त्यानंतर क्लिप व्हायरल झाल्याने नगर जिल्ह्याची वाटचाल नेमकी कोठे सुरू आहे, अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
Tags :
835
10