राष्ट्रीय शेतकरी युनीयन शेवगांव तालुकाध्यक्षपदी काकासाहेब काळुसे यांची निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
राष्ट्रीय शेतकरी युनीयनच्या शेवगांव तालुकाध्यक्षपदी आमरापुर येथील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते काकासाहेब काळुसे यांची निवड झाली आहे. त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे यांनी पाथर्डी येथे काकासाहेब काळुसे यांचा सत्कार करुन दिले. यावेळी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे पाथर्डी तालुकाध्यक्ष हारीभाऊ वायकर उपस्थीत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे यांनी नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष काळुसे यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले शेतकऱ्यांच्या समस्यांची आपल्या हातुन सोडवणुक व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.