महाराष्ट्र
जखणगाव- बिबट्या कडून शेळीचा फडशा तर महिला बेशुद्ध परिसरात भीतीचे वातावरण
By Admin
जखणगाव- बिबट्या कडून शेळीचा फडशा तर महिला बेशुद्ध परिसरात भीतीचे वातावरण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर तालुक्यातील जखणगाव येथे बिबट्याने शेळीवर हल्ला करत फडशा पाडण्याची घटना घडली आहे. बिबट्याला समक्ष पाहिल्यानंतर घरातील महिला बेशुद्ध पडली.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि.१८ मे रोजी रात्री जखणगाव येथील शेतकरी जयसिंग राधुजी मोरे यांच्या घरासमोरील शेळीवर बिबट्याने हल्ला करून शेळीचा फडशा पाडला. हिंगणगाव जखणगाव रस्त्यावर मोरेवस्ती वर बिबट्याने हल्ला करत शेळीच्या फडशा पाडला आहे. बिबट्याने शेळीवर हल्ला केल्यानंतर घरातील व्यक्तींनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही.
बिबट्याला समोर पाहून बबई जयसिंग मोरे या भीतीने बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदर घटनेचा पंचनामा व शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकुंद राजळे, वनविभागाचे कर्मचारी येणारे यांनी केले आहे.
गावचे सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले की, परिसरात वर्षभरापासून बिबट्याचा वावर तसेच उपद्रव सुरू आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सोनवणे यांनी केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी दत्तू सोनवणे, जयसिंग मोरे, दीपक मोरे, सचिन मोरे उपस्थित होते.
नागरिकांनी दक्षता घ्यावी
हिंगणगाव, जखणगाव परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. बिबट्या कडून पाळीव प्राण्यांच्या शिकार करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरी परिसरातील नागरिकांनी आपली व लहान बालकांची दक्षता घ्यावी. रात्रीच्या वेळेस बाहेर निघताना बिबट्या पासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
..... डॉ.मुकुंद राजळे (पशुधन विकास अधिकारी, हिंगणगाव)
____________________ ________________________________
वनविभागाने जनजागृती तसेच पिंजरा लावावा
हिंगणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे तरी वन विभागाच्या वतीने परिसरात जनजागृती तसेच पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा.
..... आबासाहेब सोनवणे (सरपंच, हिंगणगाव)
Tags :
11329
10