मराठा समाजाच्या विविध प्रश्नासंबधी खा.सुजय विखे यांची स्वाभिमानी मराठा महासंघाने घेतली भेट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील कायम अग्रेसर राहिले आहेत. अनेक वेळेस विरोधी पक्ष नेते असताना आ.विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम अधिवेशन प्रसंगी उपस्थित केला आहे. मराठा संघटनांची त्यांनी समन्वय बैठका घेतल्या मात्र मराठा समाजाचे प्रश्न अजूनही ऐरणी वर आहेत मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षण प्रश्न संबंधी खा. डाॕ.विखे यांनी पुढाकार घ्यावा यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांच्या सुचनेनुसार घेतली
या शिष्टमंडळात स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, प्रसिद्धी प्रमुख अमोलराजे म्हस्के , शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुधीर नागवडे आदि उपस्थित होते.
मराठा आरक्षण मिळाल्या शिवाय समाजातील बेरोजगारी कमी होणार नाही. आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे प्रश्न ऐरणीवर आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील मराठा संघटनानी एकत्र यावे असे यावेळी
खा.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांच्या मराठा चळवळीतील योगदानासाठी खा.विखे यांनी त्यांचे कौतुक केले.