पाथर्डी पालिकेसाठी दहा प्रभागांच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीवरील हरकतींची मुदत संपल्यानंतर आता पालिका प्रशासनाने शहरातील दहा प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
पालिकेने ज्या मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या होत्या, त्यांवर ७०३ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या निकाली काढल्यानंतर आज ज्या अंतिम मतदार याद्या पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केल्या, त्यानुसार या यादीमध्ये दहा हजार आठशे बावन्न पुरुष मतदार, तर दहा हजार पाचशे एक महिला मतदार, अशी एकूण एकवीस हजार तीनशे त्रेपन्न मतदारसंख्या झाली आहे.
प्रभागनिहाय मतदार पुढीलप्रमाणे : (प्रभाग एक) ९९८ पुरुष तर ८३६ महिला, (प्रभाग दोन) १०१६ पुरुष तर ९८९ महिला, (प्रभाग तीन ) ११२४ पुरुष तर १०३० महिला, (प्रभाग चार) ११८१ पुरुष तर १०९४ महिला, (प्रभाग पाच) १३६० पुरुष तर १३८० महिला, (प्रभाग सहा ) ११२७ पुरुष तर ११६४ महिला, (प्रभाग सात) ९५० पुरुष तर ९५४ महिला, (प्रभाग आठ) ९०३ पुरुष तर ९१३ महिला, (प्रभाग नऊ) ११४५ पुरुष तर ११३२ महिला, (प्रभाग दहा) ११०८ पुरुष तर १००९ महिला. पालिका प्रशासनाने निवडणुकीची एकीकडे जोरदार तयारी सुरू केली असल्याने, राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे.