श्री तीर्थक्षेत्र गहिनीनाथ (गैबी) येथील पशुहत्या कायमस्वरूपी बंद करा. प्रा. सुनिल पाखरे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील श्री तीर्थक्षेत्र गहिनीनाथ (गैबी) येथील पशुहत्या कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी बजरंग दलाचे अध्यक्ष प्रा. सुनील पाखरे यांनी इमेल व्दारे पञ पाठवून जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर, पाथर्डी पोलीस निरीक्षक यांना केली आहे.
तीर्थक्षेत्र गहिनीनाथ (गैबी) पागोरी पिंपळगांव या याठिकाणी नाथ संप्रदायातील अवधूत चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज यांची समाधी आहे. त्याठिकाणी याञे निम्मित (दि. ११) रोजी हजारो बोकडांचा बळी देण्यात आलेला आहे.
नाथ संप्रदाय हे अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत असून त्यातील नऊ नाथापैकी एक असलेले श्री गहिनीनाथ महाराज यांची समाधी आहे. नाथसंप्रदायाचा इतिहास व पार्श्वभूमी पाहता व पवित्र नवनाथ ग्रंथाचे वाचन केले असता नाथसंप्रदायात कोठेही मांस हा विषय आढळून येत नाही. नाथांना नैवद्य म्हणून मलिदा ज्यामध्ये गुळ गावरान तूप बाजरीचे व गव्हाचे पीठ वापरले जाते, या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा प्रसाद नाथांसाठी वापरला जात नाही, श्रद्धेपोटी नाथभाविक भक्तांकडून श्रीफळ, खडी साखर, रेवडी, गुलाब तेल, उद्बती, धूप, कापूर, फुलांचे हार, व नाथांना वस्त्र म्हणून भगव्या रंगांचे वस्त्र समाधीवर वाहिले जाते. त्यामुळे यात कोठे हि बोकडांचा बळी देण्याचा विषय येत नाही.सदर ठिकाणी अनेक वर्षापासून दर यात्रेला हजारो बोकडांचा बळी दिला जातो. अशा पवित्र ठिकाणी पशुहत्या घडून आणणे हे अत्यंत गैर कृत्य व धर्माच्या विरोधात आहे, हे बोकडांचे बळी अंधश्रद्धेच्या मानशिकतेतून केले जातात. त्यामुळे याठिकाणी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याची पायमल्ली होत आहे. व देवस्थानचे पावित्र्य बाटले जाते. यापुढे असे कृत्य करणारावर पशुहत्या कायद्याअंतर्गत व शस्त्रबंदी कायद्या अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश आपण द्यावेत अशी मागणी निवेदन पाठवले आहे.