दिपक महाराज काळे यांचा धर्मभूषण गोरक्षक पुरस्काराने सन्मान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथील दिपक महाराज काळे यांना धर्मभूषण व गो रक्षक पुरस्कार हिंदु धर्मरक्षक कालिचरण महाराज व हिंदुराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांचा हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच यावेळी गो सेवक पोपट घोरपडे यांनी गोशाळेतील भाकड गाईच्या चा-यासाठी 51000 हजार रूपये दान म्हणून दिले आहेत.
गो माता केंद्रात दिलेल्या गायीचे पालन पोषण अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याने गो मातांना गोशाळेच्या माध्यमातून जीवनदान दिले आहे.
कसाबाच्या तावडीतील
आज पर्यंत हजारो संख्येने गो माता कसाबाकडुन वाचवून कृष्ण गो शाळेच्या माध्यमातून 200 पेक्षा जास्त अधिक भाकड गो माता आहेत.
त्यामुळे
त्यांना गोरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार माझा नसुन मला गोमातांच्या सेवेसाठी मदत करणाऱ्या सर्व गो सेवकांचा आहे मी आपला सर्वांचा ऋणी आहे.असे यावेळी काळे महाराज यांनी सांगितले.