मित्राला सोडण्यासाठी जाताना धक्कादायक घटना, ट्रॉलीला कार धडकून ३ मित्र जागीच ठार
नातवापाठोपाठ आजोबाचे ही निधन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. श्रीगोंदा येथून काष्टी (Kashti)येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार (Car Accident ) धडकल्याने भीषण अपघात झाला.
घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. या घटनेत कार मधून प्रवास करणाऱ्या तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकून तिघांचा मृत्यू झाल्यानं काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.
अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातावेळी तातडीनं बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. या अपघातात राहुल आळेकर, केशव रायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांना धक्का बसलाय.
दरम्यान आपल्या नातवाचे अपघाती निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांचे निधन झाल्याची दुर्दैवी दुःखद घटना श्रीगोंदयात आज सकाळी घडली आहे
शहरातील राहुल आळेकर या युवकाचे रात्री अपघाती निधन झाले त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मयत राहुल याचे आजोबा(आईचे वडील)जालिंदर लहानू शिंदे (वय ६३) रा घारगाव हे आज सकाळी अंत्यविधीसाठी आले होते.
त्यांना नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला
नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांचा मृत्यू झाल्याच्या या धक्कादायक दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.