पाथर्डी- शाॕक लागून तीन जणांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील विविध दोन घटनांमध्ये शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूत पती-पत्नीचा समावेश आहे तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पाथर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील सांगावी खुर्द गावात शेतकरी पती पत्नीला आज सकाळी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. हे पती-पत्नी सकाळी घरासमोर काम करतांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला.
माणिकदौंडी भागातील शिंदेवाडी येथील बबन मोहन शिंदे (वय ५५) यांच्या अंगावर विजेची वायर तुटून पडल्याने राहत्या घरा समोर त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे हे दुपारी शेतीचे काम करत असताना वारा पाऊस जोरात सुरू होता. त्यावेळी विजेच्या खांबावरून वीज प्रवाह घरात घेऊन जाणारी केबल शिंदे यांच्या अंगावर पडली. यात शिंदे यांचा मृत्यू झाला.