महाराष्ट्र
824
10
मी लिहुन देतो त्याच्यांवर कारवाईचे धाडस दाखवणार नाहीत.खा.सुजय विखे यांचे टिकात्मक वक्तव्य
By Admin
मी लिहुन देतो त्याच्यांवर कारवाईचे धाडस दाखवणार नाहीत.खा.सुजय विखे यांचे टिकात्मक वक्तव्य
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
'दसऱ्याच्या निमित्ताने काही ठराविक लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. काही तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी उद्या कार्यक्रम घेणार आहेत. या कार्यक्रमाला त्यांनी गर्दी केली, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी करणार नाहीत, हे मी लिहून देतो,' असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट करतानाच आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला.
अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणात सहभागी होण्यासाठी खासदार विखे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, 'नगर जिल्ह्यातील गावांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय हा पूर्णता चुकीचा आहे. अनेक वेळा यावर वादविवाद झाले. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जास्तीतजास्त लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. गावेच्यागावे शंभर टक्के लसीकरण कसे होतील, हे पाहिले पाहिजे. तसेच ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले आहेत, त्यांना लॉकडाऊनची आवश्यकता नाही. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय पुढे कोणी जाऊ शकत नाही. हा निर्णय अन्यायकारक असला तरी कायद्याच्या विरोधात जाऊन आपल्याला बोलता येत नाही. पण लॉकडाऊनची जी प्रक्रिया सुरू आहे, ती संपूर्ण देशात फक्त नगर जिल्ह्यातच आहे. नगर जिल्ह्यावर अन्याय करणारा हा निर्णय आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दसऱ्याच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खर्डा येथेही आमदार रोहित पवार हे स्वराज्य ध्वज उभारणार आहे. यावरूनही विखे यांनी अप्रत्यक्षरित्या पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'दसऱ्याच्या निमित्ताने काही ठराविक लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. ते भाषणात तसे बोलतात सुद्धा. पण प्रशासनाचा पक्षपातीपणा सरसकट आढळून येतो. जिल्हाधिकार्यांनी निपक्ष राहून काम केले पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीच्या चुकीच्या कृतीवर सुरुवातीपासून कानाडोळा करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी यांनी दाखवलेले नाही. उद्या काही तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी यांनी कार्यक्रम घेऊन गर्दी केली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी करणार नाही, हे मी लिहून देतो,' असेही विखे म्हणाले.
Tags :

