महाराष्ट्र
युक्रेनहून मायदेशी परतलेल्या दर्शन आंधळे चे पाथर्डीत भव्य स्वागत
By Admin
युक्रेनहून मायदेशी परतलेल्या दर्शन आंधळे चे पाथर्डीत भव्य स्वागत
पाथर्डी प्रतिनिधी
रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाने चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत. त्यातील अहमदनगर जिल्ह्यातील काही विद्यार्थी मायदेशी सुखरूप परतले असून त्यात पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी येथील दर्शन आंधळे हा विद्यार्थी सुखरूप परतला आहे.
युक्रेन या देशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेला दर्शन सतिश आंधळे नुकताच मायदेशी सुखरूप परतला. भारत सरकार राबवत असलेल्या " मिशन गंगा ऑपरेशन अंतर्गत " या विद्यार्थ्याचे मुंबई विमानतळावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वागत केले. तसेच अहमदनगर येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वागत व सन्मान केला. तसेच त्यांनी दर्शन आंधळेच्या बरोबर व पालकाबरोबर संवाद साधून सुमारे एक तास चर्चा केली.अनेक दिवसापासून रशिया व युक्रेन या दोन देशात युध्द सुरू असून परिस्थिती चिघळत आहे. युक्रेन या देशात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. या विद्यार्थी पैकीच पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी येथील दर्शन सतिश आंधळे हा एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांना काठिण प्रसंगास सामोरे जावे लागत होते. दर्शन आंधळे नुकताच या कठीण प्रसंगातून पाथर्डी येथे परतला. पाथर्डी शहरातील सर्व शिक्षक बांधव, सर्व आप्तेष्ट ,नातेवाईक आणि आनंदनगर परिसरातील रहिवासी ,सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन आंधळे याचे भव्य स्वागत केले.
याप्रसंगी उपस्थित महिलांनी दर्शन चे औक्षण करून त्याला शुभ आशीर्वाद दिले. परिसरातील रहिवाशांनी फटाके फोडून व पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सतीश आंधळे व त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दर्शनला सामोरे जावे लागलेल्या बिकट प्रसंगाचे अनुभव ऐकून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
याप्रसंगी अशोक आंधळे, आरीफ बेग, संजीवनी आंधळे, प्रमोद दाहिफळे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ॲड. श्रीधर सारूक, अशोकराव आंधळे , मारुती कराड , बाबासाहेब जायभाये , किसनराव आंधळे ,रवींद्र आंधळे , प्रदीप आंधळे , परमेश्वर आंधळे विठ्ठल आंधळे , आरीफ बेग, अर्जुन दहिफळे, लक्ष्मण आंधळे, मेजर अंबादास आंधळे , मारेकर साहेब , रोकडे भाऊसाहेब ,अशोक दौंड, दीपक बांगर ,अशोक वामन , संजीवनी आंधळे ,विधाटे मॅडम, बाप्पा शेळके , पोपटराव दहिफळे , शरद भागवत, बाळासाहेब बडे, ओंकार कराड, प्रतिक जायभाये आदी उपस्थित होते.
शेवटी उपस्थित सर्व नागरिकांचे पालक सतिश आंधळे यांनी आभार मानले.
Tags :
2771
10