अवैधरित्या दारु विक्री करताना एका व्यक्तीस पकडले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर येथे दारुबंदी असतानाही गावात अवैधरित्या दारु विक्री करताना एकजण आढळून आल्याने पोलिसांनी सोमवारी (ता.24) त्यास ताब्यात घेतले आहे.
राजूर ग्रामपंचायतच्या मागे येथे राजेंद्र यशवंत भराडे हा अवैधरित्या देशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकत त्याची झडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे संत्रा कंपनीची देशी दारुच्या 87 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी पोलिस शिपाई फटांगरे यांच्या फिर्यादीवरुन राजूर पोलिसांत आरोपी राजेंद्र यशवंत भराडे (वय 46, रा. देवठाण, ता. अकोले) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक डी. के. भडकवाड हे करीत आहेत.