पोलिस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दाखल गुन्हा बंद करण्यासाठी २२ हजारांची लाच मागणाऱ्या बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार प्रकाश बारवकर यांच्याविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवंडी पोलिस ठाण्यात येळपणे येथील एक मिसिंग बाबतचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार प्रकाश बारवकर हा करत होता. या मिसिंग गुन्ह्यात मदत करुन हे प्रकरण बंद करण्यासाठी बारवकर याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. संबधित तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने १७ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारदार व आरोपी बारवकर यांच्यात तडजोड होऊन २२ हजाराची मागणी केली व ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच स्वीकारण्याअगोदर आरोपी बारवकर याला शंका आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर, पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे यांच्यासह कर्मचारी संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हारुन शेख, राहुल डोळसे यांनी ही कारवाई केली.