महाराष्ट्र
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरातुन उद्याचे भावी नागरिक सक्षम होतील मा राहुल राजळे
By Admin
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरातुन उद्याचे भावी नागरिक सक्षम होतील मा राहुल राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि दादापाटील राजळे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आदिनाथनगर ता-पाथर्डी जि-अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव निमित्त माझी वसुंधरा या विचाराने राष्ट्रीय सेवा योजनेचे विषेश शिबिर मंगळवार दि 22/02/2022 ते सोमवार दि 28/2/2022 या कालावधीत मु पो कासार पिंपळगाव ता- पाथर्डी जि- अहमदनगर येथे उत्साहात संपन्न झाले.
शिबिराचा समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. राहुलदादा राजळे विश्वस्त, श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात या शिबिरामुळे मदत होते. त्यामूळे जे विद्यार्थी या शिबिराचा भाग आहेत ते उद्याचे सक्षम ,सुदृढ नागरीक होतील अशी आशा आहे. असे मत त्यानी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी मा. काकासाहेब शिंदे विश्वस्त, श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवकांनी व्यसनापसून दूर रहावे असा सल्ला दिला. त्याचबरोबर प्रमोद म्हस्के ग्रामसेवक कासार पिंपळगाव यांनी मनोगतात सांगितले की आमच्या गावात शिबिर आयोजित केलं आणि आम्हाला ग्राम स्वच्छतेची जी शिकवण दिली ती आम्ही पुढे कायम ठेवू.अशी भावना व्यक्त केली. मा सुभाषराव ताठे विश्वस्त, श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था,यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य अंकुश राजळे यांनी विद्यार्थ्यांनी गावांमध्ये केलेल्या श्रमदाना बद्दल त्यांचे आभार मानले. तसेच पत्रकार अमोल म्हस्के यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा.शेषराव ढाकणे, मा. कुशिनाथ बर्डे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री वसंतराव भगत ,चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी कासार पिंपळगाव यांनी भूषवले त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रामाणिक कष्ट करणारा जीवनात यशस्वी होतो आणि प्रामाणिक काम करण्याची सवय या शिबिरामुळे लागते असे मत मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले.समाजसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रूजवने हा मुळ उद्देश या शिबिराचा असतो असे सांगितले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांचे मार्गदर्शन लाभले. कासार पिंपळगावचे सरपंच माननीय सौ. मोनालीताई राहुल राजळे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी पोलिस पाटील श्रीआप्पासाहेब एकनाथ राजळे, मा. विक्रम राजळे, ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.अनुराधा कराळे यांनी केले,कु.साक्षी जोशी,आकांक्षा काळे व आनंद बरडे या विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभव सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. साधना म्हस्के यांनी मानले. विशेष शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा आसाराम देसाई, प्रा. अस्लम शेख, डॉ नितीन भिसे प्रा योगिता इंगळे व यांनी सहकार्य केले.या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
Tags :
129
10