अहमदनगर जिल्ह्यातील 'या' २१ गावामध्ये पुन्हा लाॕकडाऊन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हाप्रशासनाने काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी कडक उपयायाेजना करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला ६१ गावांंमध्ये लाॅकडाऊन हाेते. आता २१ गावांमध्ये लाॅकडाऊन कायम ठेवला आहे. याशिवाय आठ गावांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून उपाययाेजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
संगमनेरमधील उंबरी, वेल्हाळे, चंदनापुरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बुद्रुक, जाेर्वे, पारनेरमधील जामगाव, वासुंदे, काेपरगावमधील टाकळी, नेवासेमधील चांदा, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, श्रीगाेंद्यातील लाेणी व्यंकनात, घारगाव, काेथूळ आणि अकाेले तालुक्यातील वीरगाव, सुगाव बुद्रुक व कळस बुद्रुक ही गावे शनिवारपर्यंत (ता. २३) लाॅकडाऊन करण्यात आली आहे. लाॅकडाऊन असलेल्या गावांमध्ये २० पेक्षा जास्त रुग्ण असल्याने ही कार्यवाही करण्यात येत आहे. या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर जीवनाश्यक सेवा बंद राहतील.
याशिवाय पारनेर, संगमनेर, श्रीगाेंदे आणि राहाता या चार तालुक्यातील आठ गावांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. त्यात पारनेरमधील निघाेज, संगमनेरमधील घुलेवाडी, घारगाव व गुंजाळवाडी, श्रीगाेंद्यातील काष्टी आणि राहाता तालुक्यातील लाेणी खुर्द, काेल्हार बुद्रुकचा यात समावेश आहे. सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. धार्मिक स्थळे, शाळा, आठवडे बाजार, जनावरांचे बाजार बंद राहतील. काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.