मराठा आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास मंत्र्यांना फिरु देणार नाही. कृषिराज टकले
शेवगाव - प्रतिनिधी
मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे या मागणीसाठी युवराज संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषण करत आहे संभाजीराजे यांच्या समर्थनार्थ शेवगाव येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण मराठा भुषन चंद्रकांत महाराज लबडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या उपोषणात स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ कृषिराज टकले, अनिल सुपेकर, शरद थोटे, प्रविण भिसे,डॉ अनिल चिकने. विलास.चव्हाण, हरीभाऊ काळे.आदी मराठा सहभागी झाले होते
याप्रसंगी मराठा भुषन चंद्रकांत महाराज लबडे यांनी सांगितले की मराठा समाजाचे राजेंना उपोषणास बसावे लागते आणि उपोषण करुनही प्रश्न सुटत नाही त्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाचा प्रश्न सुटत नसेल तर मंत्र्यांना फीरु देणार नाही स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषीराज टकले म्हणाले की संभाजीराजेंना उपोषन करावे लागते हे दुर्दैव आहे मराठा समाजाच्या आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी अनेक समित्या नेमल्यात आहे त्या निष्क्रिय ठरल्या आहे आता त्या समित्यांवर विश्वास राहिला नाही आता शासनाने कृती करावी मराठा समाजाचे प्रश्न सुटत नसतील तर येणार्या निवडणुकीमध्ये मतदानावर मराठा समाज बहीष्कार टाकेल.
यावेळी अमोल घोलप,डॉ निरज लांडे, तुषार पुरनाळे, संदिप खरड, प्रशांत लबडे, जगन्नाथ पवार, राजेंद्र डहाळे, विलासराव चव्हाण,अक्षय खोमणे,प्रदिप जाधव, प्रशांत म्हस्के व यावेळी विविध संघटनांनी व पक्षांनी पाठिंबा दिला यामध्ये ST कर्मचाऱ्यांच्या वतिने दिलीप लबडे, भाजपकडून तालुकाप्रमुख ताराचंद लोंढे, प्रहार चे रामजी शिदोरे , शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटागरे, गो सेवक व हजारो कार्यकर्तेनी उपोषणाला पाठिंबा दिला.
यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी दुरध्वनी मार्फत लबडे महाराजांचे अभिनंदन केले.