मंञी विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.
-अंकुशराव डांभे
पाथर्डी- प्रतिनिधी
नगर सिटीझन
संविधानिक पदावर असताना मराठा समाजाच्या विरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष व राज्य निरीक्षक अंकुशराव डांभे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय वडेट्टीवार हे मंत्रिमंडळात असतानादेखील मराठा आणि ओ बी सी समाजदरम्यान जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात.समाजसमाजात वाद पेटवतात,गायकवाड अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात,कोरोनाकाळात ओ बी सि चें मेळावे घेतात,मराठा आरक्षणाला उघड विरोध करतात यामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्यास वडेट्टीवार जबाबदार आहेत.त्यांनी राजीनामा देऊन खुशाल गुन रत्न सदावरतेबरोबर हातमिळवणी करावी,मराठा समाज त्यांची जागा यावेळेस निश्चित दाखवून देईल असेही निवेदनात म्हटले आहे. डॉ. कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यकडे केली आहे. निवेदनावर, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा ताई निमसे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, युवती जिल्हाध्यक्षा संस्कृती गुंजाळ, यांच्या सह्या आहेत.