व्यापाऱ्याला लुटले, साडेचार लाखांचा ऐवज लंपास
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खासगी वाहनात बसून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या व्यापार्याला वाहन चालकांनी लुटले. चार लाख 56 हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे, साडेचार हजार रूपयांची रोख रक्कम, असा चार लाख 60 हजार 500 रूपयांचा ऐवज लुटला असल्याची फिर्याद व्यापारी रसिकलाल मोतीलाल सोळंकी (रा. हवेली जि. पुणे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.
सोळंकी माळीवाडा बस स्थानकाच्या बाहेर पुणे येथे जाण्यासाठी थांबले होते. यावेळी पांढर्या रंगाचे चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आले. पुण्याला जायचे आहे, तुम्हाला लवकर पोहचवतो, असे म्हणत सोळंकी यांना वाहनात बसविले. सोळंकी यांनी त्यांच्याकडील बॅग वाहनात पाठिमागे ठेवली. पुढे केडगाव बायपास येथे या वाहन चालकाने सोळंकी यांना खाली उतरून दिले व तो नगरच्या दिशेने आला. सोळंकी घरी गेल्यावर त्यांनी बॅग तपासली असता त्यातील रोख रक्कम, दागिणे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.