पाथर्डी - घरफोडी करणाऱ्याला अटक,एलसीबीची कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात दिवसा घराचे कुलूप तोडून चोर्या करणार्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. चैतन्य बलभिम कांबळे (रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या टोळीचा मोरक्या राहुल पगारे (रा. कासार पिंपळगाव) व अन्य एक साथीदार पसार झाले आहेत.
26 जुलै रोजी रघुनाथ जबाजी जाधव (रा. जवखेडे खालसा ता. पाथर्डी) हे घर बंद करून बाहेरगावी गेले असता सायंकाळी त्यांचे घर फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे, मोबाईल असा 51 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. जाधव यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा राहुल पगारे टोळीने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी एक पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी पगारे मिळून आला नाही. मात्र त्याच्या टोळीतील चैतन्य कांबळे व एक अल्पवयीन साथीदार मिळून आले.