येत्या ४ ते ५ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.
येत्या ४८ तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील ४ ते ५ दिवस कोकण,
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा जास्त प्रभाव राहू शकतो.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
सध्या कोकण विभाग वगळता इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे.
कोकण विभागात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकणासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र,येत्या ४८ तासात उत्तर/उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता.
त्या मुळे येत्या ४,५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आय.एम.डी.
( I.M.D.) ने वर्तवली आहे.
कोकण विभागात ५ ते ६ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
७ सप्टेंबरला काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात ६ सप्टेंबरनंतर प्रामुख्याने घाट विभागात पावसाचा जोर राहणार आहे.