चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याचे तंञ या राजकीय पक्षावर केली या मंञ्याने धक्कादायक टिका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याचे भाजपचे तंत्रच आहे,’ असा घणाघाती आरोप करतानाच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीच्या प्रकरणावरून भाजप नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘कशा पद्धतीने एखाद्याला गुंतवायचे, खरे काहीच नसताना त्याच्या विरोधात समाजात वातावरण तयार करायचे, हे भाजपला चांगले जमते,’ असेही ते म्हणाले.
आष्टी (जि.बीड) येथे जात असताना अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर धनंजय मुंडे आज, गुरुवारी काहीकाळ थांबले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीबाबत बोलताना मुंडे म्हणाले, ‘या चौकशीमध्ये राजकारण चालू आहे. केंद्र सरकारच्या ज्या काही संस्था आहेत, त्यामध्ये भाजपचे नेते हस्तक्षेप करून अशा चौकशी करीत असून ही त्यांची निती आहे. खरे काय आहे, हे येणाऱ्या काळात समोर येईलच. सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिनचीट दिल्याचेही स्पष्ट झाले आहे,’ असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना मुंडे यांनी भाजपचे किरट सोमय्या यांनाही टोला लगावला. ‘किरट सोमय्या यांना कोण किती गांर्भियाने घेते, हे सर्वांना माहिती आहे,’ अशी खोचक टीका त्यांनी केली.
दरम्यान, राज्यामध्ये गेल्या वर्षभरापासून बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित आहेत. यावर मुंडे यांना विचारले असता बारा आमदारांची नियुक्ती का होत नाही, हा प्रश्न राज्यपालांनाच विचारला हवा, असे ते म्हणाले.
नुकसान भरपाई देण्यास सरकार सकारात्मक
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नगर जिल्ह्यासह बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, ‘मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. जे नुकसान झाले, त्याची भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.’