कासार पिंपळगाव- नुकसान झालेल्या शेतावर भेट देवून पिकाचे पंचनामा करण्याचे आदेश
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परीसरात दिनांक ३० व ३१ रोजी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम ग्रामपंचायत सरपंच सौ. मोनाली राहुल राजळे यांनी केले.! गावांमधील प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतावर भेट देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन करण्याबरोबर तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश देऊन माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांच्यामार्फत शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल यासाठी पाठपुरावा करू असे शेतकऱ्यांना आश्वासित केले.
नदी वरून घोडके वस्ती कडे जाणार रस्ता अतिवृष्टीने वाहून गेल्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करून त्यांचा दळण वळण रस्ता तयार करून देण्यात आला.
मधला मळा कवळे वस्ती सानट वस्ती नदीचा परिसर या भागात पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाले आहे तसेच संतोष मोरे,सूर्यभान मोरे यांच्या वाहून गेलेले पशुधन बाबत व घर पडझड चे झालेले नुकसान बाबत माहिती घेऊन याबाबत भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.