महाराष्ट्र
878
10
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजप नेत्यांनी घेरले
By Admin
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजप नेत्यांनी घेरले
राजळे समर्थकांकडून तनपुरे यांच्या समोर अनेक प्रश्नांची भडीमार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्या मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना मोठा महापूर आला होता यामध्ये कोरडगाव, आखेगाव, सोमठाणे, पागोरी पिंपळगाव, सांगवी, मुखेकर वाडी, तोंडोळी, कळसपिंपरी, मोहज देवढे अकोला,
येळी, शेकटे, निपाणी जळगाव, फुंदेंटकळी, सुसरे, आदी गावांचे मोठे नुकसान झाले, असून येथील गावकऱ्यांना शासनाने पिकाची नुसकान भरपाई तसेच तातडीने आर्थिक स्वरूपात मदत करावी यासाठी आ मोनिका राजळे समर्थकांनी भाजपाचे पंचायत समिती सदस्य माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना सोमठाण येथे
घेराव घालून अनेक प्रश्नांनांची भडीमार केली अतिवृष्टीमुळे महापूर येऊन चार दिवस उलटले यानंतर तब्बल चार दिवसांनी मंत्री महोदयांना या भागाचा दौरा करून विविध ठिकाणी भेटी देऊन नुस्कान झालेल्या शेतीची पाहणी केली.
यावेळी शेतकरी आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, आदी उपस्थित होते यावेळी बोलताना विष्णुपंत अकोलकर म्हणाले की अतिवृष्टीमुळे कधी नव्हे तर आमच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची मोठी हानी झाली असून ही हानी भरून निघणारी नसून शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरत शासनाने तुटपुंजी मदत न करता भरीव मदत करावी. तसेच यावेळी विष्णुपंत अकोलकर यांनी खालील प्रश्न उपस्थित करून मंत्री तनपुरे यांचे लक्ष वेधले
1, पडलेले विजेचे पोल व तुटलेले ताराची दुरुस्ती करून तातडीने विज पुरवठा सुरळीत करावा
2, सरसकट पिकाचे, मृत व वाहून गेलेले जनावरांचे पंचनामे करुन बाजारभाव प्रमाणे नुकसान भरपाई दयावी
3, सर्व रस्त्याचा दुरुस्ती करीता तातडीने विशेष निधी उपलब्द करून द्यावा
4, बाधित गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा
5, तालुक्यातील सर्व गावाचे व पिकांचे सर्रास पंचनामे करावेत
6, पडझड झालेल्या व पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या विहिरीच्या दुरुस्ती करीता विशेष निधी उपलब्ध करून द्यावा
7,लोकांना किराणा व अन्नधान्ययाची त्वरीत उपलब्दता करून द्यावि
8, कमी उंचीची पुलाची दुरुस्ती करावी
9. ज्या नागरिकांची घरे पडले आहेत त्यांना पंतप्रधान योजनेतून लाभ मिळावा.
आदी मागण्या यावेळी विष्णुपंत अकोलकर यांनी केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, सुभाष केकान, खरेदी-विक्री संघाचे संचालक संदीप पठाडे राजेंद्र साप्ते. आदी उपस्थित होते
Tags :

