पाथर्डी- राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहर व नगरपरिषद हद्दीतील नागरी सुविधा मागील काही महिन्यापासून पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून अक्षम्य पद्धतीने दुर्लक्ष दिरंगाई होत आहे. पालिकेने सुरू केलेल्या विकासकामांच्या बाबतही अनेक गैरप्रकार सुरु आहेत. या सर्व प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब धस या तिन्ही पक्षाच्या प्रमुखाने महाविकास आघाडीच्या वतीने नागरी समस्या बाबत निवेदन देऊन मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.