महाराष्ट्र
45021
10
नवजीवन डे स्कूल मध्ये शिवजयंती उत्सवात संपन्न
By Admin
नवजीवन डे स्कूल मध्ये शिवजयंती उत्सवात संपन्न
सिन्नर तालुका प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूल येथे शिवजयंती उत्सवात संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ अनिता सूर्यवंशी यांनी भूषविले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिव अभ्यासक महामित्र दत्ताजी वायचळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शिवचरित्र संबोधित करताना सांगितले की शिवराय हे देव नाहीत..
शिवराय महामानव आहेत, महापुरुष आहेत.
मन, बुद्धी आणि मनगटाच्या बळावर, स्वकर्तृत्वातून, पराक्रमातून, संघर्षातून शिवरायांनी निर्माण केलेल्या दैदिप्यमान इतिहासामुळे शिवराय हे एखाद्या चमत्कारिक देव-देवतांपेक्षा निश्चितच कैक पटीने श्रेष्ठ ठरतात...
अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर,
अगदी 33 कोटी देवांची फलटणही शिवरायांच्या नावासमोर फिकी पडते..
तेव्हा अकारण, भावनेच्या भरात दैवी संकल्पनेच्या दृष्टिकोनातून शिवरायांना पाहणे थांबवावे...
शिवराय हे जागतिक कीर्तीचे, महापराक्रमी महापुरुष,महामानव..!कारण एकदा दैवतीकरण झाले म्हणजे शिवरायांचा समग्र पराक्रम केवळ चमत्कारातून घडला,
असे म्हणायला येथील भोंदूबुवा कमी करणार नाहीत... याचबरोबर त्यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच सावित्रीबाई फुले या महामानवांचा सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती दिली या सोबतच शाळेचे सिनियर केजी या वर्गातील श्रीशा लुटे तसेच प्राथमिक वर्गातील कृष्णा केकान, श्री वेद पवार, शुभम गोसावी ,सोनल वाडेकर, अस्मिता देशमुख ,वेदांत डावरे, समर्थ शिंदे तसेच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी ही आपले महाराजांप्रती भावना व्यक्त केल्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला पोवाडा गायक - त्रिशांत बागे
ढोलकी साथीदार सोहम शिंदे
कोरस साथिदार- वल्लभ राजे वाघ,
श्रेयस पुरी, सोहम बोरडे, प्रतिक झगडे, ध्रुव भाटजीरे, रुद्र पाचोरे, प्रभास पवार,
समर्थ शिंदे , आरव सानप, सिद्धार्थ भारद्वाज, वेदांत वाजे.शाळेचे क्रीडाशिक्षक श्री अमर बैरागी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लाठीकाठी चा खेळ अतिशय उत्कृष्ट रीतीने सादर केला तसेच सौ स्मिता लुटे मॅडम यांनी बसवलेला लेझीम पथक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सुंदर लेझीम सादरीकरण केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे शिक्षण अधिकारी श्री बी. बी. पाटील सर तसेच मुख्याध्यापिका सौ सविता फड, सौ प्रीती गुजराथी,योगिता भाटजिरे,श्री नरेंद्र वाघ सर,श्री शरद शिंदे सर, श्री राहुल चव्हाण सर, श्री संदीप काळे सर, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रियंका देशपांडे व सौ रेखा लोणारे यांनी केले शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता फड यांनी प्रमुख पाहुण्यांचे व आलेल्या पालकांचे आभार मानले
Tags :
45021
10




