महाराष्ट्र
10617
10
श्री तिलोक जैन विद्यालयात माजी विद्यार्थी संघ समितीची स्थापना
By Admin
श्री तिलोक जैन विद्यालयात माजी विद्यार्थी संघ समितीची स्थापना
पाथर्डी प्रतिनिधी:
येथील श्री तिलोक जैन विद्यालयात माजी विद्यार्थी संघ समितीची स्थापना अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य अजय भंडारी यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापनेचे महत्त्व स्पष्ट करताना माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, मार्गदर्शन व सहकार्य यामुळे विद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे मत व्यक्त केले. समिती प्रमुख सुनिल कटारिया व आतिश भावसार यांनी सर्वांचे स्वागत केले या नंतर सर्वानुमते माजी विद्यार्थी संघ समितीची निवड प्रक्रिया पूर्ण करून समितीची घोषणा करण्यात आली. सदर समिती मध्ये निवडण्यात आलेली कार्यकारीणी पुढीलप्रमाणे :महेश बाहेती - अध्यक्ष , अभय गांधी - उपाध्यक्ष ,अजय भंडारी - सचिव, गणेश पैठणकर- खजिनदार ,अमोल कांकरिया - प्रसिद्धी प्रमुख ,अनिल खाटेर - प्रसिद्धी प्रमुख , मा.गणेश मरकड,डॉ.ऋषिकेश कुलकर्णी, सुनिल कटारिया, आतिश भावसार ,डॉ.अनिल पानखडे ,अमोल उरणकर , गौतम गुगळे , महेश सानप , निलेश खाबिया ,राहुल दरंदले ,जब्बार पठाण , संदीप लोखंडे - सदस्य व विद्यालयातील माजी सेवानिवृत्त शिक्षिका साधना रेदासनी यांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष महेश बाहेती उपाध्यक्ष अभय गांधी , प्रसिद्धी प्रमुख अमोल कांकरिया व खजिनदार गणेश पैठणकर यांनी देखील आपले विचार स्पष्ट केले .या सर्वांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत संघ समितीमध्ये स्थान देऊन कार्य करण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यातून निश्चित शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.यावेळी उपस्थित सर्वच माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाशी असलेले नाते अधिक दृढ ठेवत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी केले तर आभार प्राचार्य अजय भंडारी यांनी मानले.या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य अजय भंडारी, उपमुख्याध्यापक अशोक गर्जे,पर्यवेक्षिका मनिषा मिसाळ, कार्यालयीन प्रमुख महेंद्र राजगुरू या सह शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Tags :
10617
10




