कोव्हीड केअर सेंटर मधील रुग्णांना 'या' खासदाराच्या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण !
नगर सिटीझन live टिम- 21 एप्रिल 2021
रामनवमीचे औचित्य साधुन शिर्डी येथील कोव्हीड केअर सेंटर मधील रुग्णांना विखे पाटील परिवाराच्या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण देण्यात आले.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वत: उपस्थित राहुन रुग्णांच्या आरोग्याची विचारपुस केली. शिर्डीच्या दृष्टीने रामनवमी उत्सवाचे महत्व खुप मोठे आहे. कोव्हीड संकटामुळे सलग दुस-यावर्षी शिर्डीतील रामनवमी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा लागला आहे.
या उत्सवाचे असलेले महत्व लक्षात घेवून विखे पाटील परिवाराने कोव्हीड केअर सेंटर मध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांना पुरणपोळी आणि आमरसाचा प्रसाद देवून या उत्सवाचा आनंद व्दिगुणीत केला.
डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी रविंद्र ठाकरे, तहसिलदार कुंदन हिरे, आरोग्य आधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, डॉ.प्रितम वडेगावकर, डॉ.मैथीली पितांबरे, डॉ.घोगरे यांच्यासह स्थानिक नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते.
या दरम्यान खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारणा करतानाच आरोग्याबाबत सुचनाही केल्या.
उपस्थित वैद्यकीय आधिकारी व महसुल विभागाला कोव्हीड सेंटर मधील अधिकच्या बेडची संख्या वाढविण्याबाबत तसेच इतर आरोग्य सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.