शेवगांव पोलिसांची बंदी असलेल्या चायनीज मांज्यावर धडक कारवाई मांजा केला जप्त
शेवगाव- प्रतिनिधी
दिनांक 19/12/2024 वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 18 डिसेंबर बुधवार रोजी गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार शेवगांव शहरातील क्रांती चौक परिसरातील एका दुकानात भारतात बंदी असलेला चायनीज मांजा विक्री साठी आल्याची माहिती मिळताच शेवगांव पोलीस स्टेशन चे पो. हे. कॉ. अरविंद चव्हाण पो.हे.कॉ. प्रशांत आंधळे आणि पो.कॉ.अजिनाथ शिरसाठ, पो.कॉ.शाम गुंजाळ या सहकार्यांनी संशयित आरोपी मुबारक शेख वय 24 रा. दहिफळ ता. शेवगांव यांचेकडुन ताब्यात घेतला यावेळी पंच म्हणून नवनाथ भिसे आणि सोनु वाघमारे यांच्या समक्ष बंदी असलेला मला ताब्यात घेतला या चायनीज मांज्यामुळे यापूर्वी अनेक नागरिक दुचाकीस्वार जनावरे पशु पक्षी जखमी झाले आहेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे कटलेल्या पतंगाच्या सोबतचा मांजा रस्त्यावर पडल्याने अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने शासनाने या मांज्यावर बंदी आणली आहे त्यामुळे काल शेवगांव पोलिसांनी शेवगांवचे कर्तव्यदक्ष लोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरात काल अनेक ठिकाणी धाडी टाकून मांज्या जप्त केला शहरात व तालुक्यात कुठे चायनीज मांजाची विक्री होत असेल तर सुजाण नागरिकांनी शेवगांव पोलिसांना माहितीद्यावी असे आवाहन केले आहे