जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा दुपारपर्यंतच सुरू राहणार-उदय शेळके
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 24 एप्रिल 2021
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कामकाज वेळेत बदल केला असून, येत्या ३० एप्रिलपर्यंत सर्व शाखा सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८५० ते ९०० विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमार्फत खरीप पिकांसाठीचे कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेला दिलेल्या पीक कर्जाची उद्दिष्टप्रमाणे बँक कर्ज वाटप करणारच आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना व भगिनींना तसेच बँकेच्या इतर सर्व ग्राहकांनी कोरोनापासून स्वत:च संरक्षण करावे.
शाखांमध्ये गर्दी न करता सर्वांनी एकमेकाच्या सहकार्याने कामकाज चालवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले आहे.
...
बँकेचे १६० कर्मचारी पॉझिटिव्ह
बँकेचे कर्मचारी व सोसायटीचे सचिव हे या परिस्थितीतही काम करत आहेत. त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. बँकेचे जवळपास १६० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ८ कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. याशिवाय ३० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.