महाराष्ट्र
वाचनाने माणसं सुसंस्कृत होतात-गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे
By Admin
वाचनाने माणसं सुसंस्कृत होतात-गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे
श्री तिलोक जैन विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन
पाथर्डी प्रतिनिधी:
वाचनाने माणसांची व्यक्तिमत्त्व प्रभावी होऊन माणसं सुसंस्कृत होतात, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी श्री शिवाजीराव कांबळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग पंचायत समिती पाथर्डी यांच्या वतीने श्री तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी येथे आयोजित महावाचन उत्सव अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना सांगताना ते पुढे म्हणाले की, शरीराला जसे अन्न लागते तसे मनाला वाचन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी थोरांची चरित्रे वाचावीत, स्वतः चे अनुभव लिहावेत, त्यामुळे मन व बुद्धिचा विकास होऊन स्पर्धेत येणारी आव्हाने पेलण्यास मदत होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सतिष गुगळे हे होते. अपयशातून माणसाला बाहेर काढण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाचा मार्ग वाचन मार्गावरून गेलेला असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी मैत्री करावी, असे प्रतिपादन अध्यक्ष पदावरून बोलतांना सतिश गुगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री अनिल भवार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रामनाथ कराड, श्री हबीब मुंढे, प्राचार्य अशोक दौंड, डॉ. कैलास दौंड, दिलावर फकीर , सुधाकर सातपूते, केंद्रप्रमुख बाबागोसावी, श्री. महांडुळे, श्री. गोरे, उध्दव बडे, श्री. लांघी, विषयतज्ञ श्री. इनामदार, बारगजे उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनात श्री तिलोक जैन विद्यालय, एम. एम. नि-हाळी विद्यालय, श्री विवेकानंद विद्यालय, कानिफनाथ माध्यमिक विद्यालय, संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय,नगर परिषदचे हिंद वाचनालय , विविध प्राथमिक शाळा, डॉ. कैलास दौंड यांची साहित्य संपदा आदी संस्था व विद्यालय यांनी पुस्तक स्टाॅल लावून सहभाग घेतला. ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थी शिक्षक, पालक, वाचन प्रेमी यांनी वाचन स्टाॅल ला भेटी दिल्या.
ग्रंथ प्रदर्शनात काही विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण, वाचन आवड, स्वत: चे अनुभव देखील व्यक्त केले. दिवसभर मुलांनी कविता, बाल कथा, प्रवासवर्णन आदी विषयावरील साहीत्याचे वाचन केले.
कार्यक्रमाच्या आरंभी वैशिष्ट्य पूर्ण वेशभूषेतील विद्यार्थी, गणेश सरोदे व गणेश कांबळे यांनी रेखाटलेली सुंदर रांगोळी, ग्रंथ दिंडी, संत ज्ञानेश्वर महाराज यांची वेशभूषा लक्ष वेधून घेणारी होती. कार्यकमासाठी भाऊसाहेब गोरे, प्रा. मच्छिंद्र बाचकर, प्रा. संतोष घोगरे, जब्बार पठाण ,प्रकाश लवांडे,अजय शिरसाट, भगवान बांगर, नवनाथ तांदळे ,महादेव खोटे, मुसवत सर, प्रतिभा दौंड, छाया कर्डिले, प्रा. संजय ससाणे,संजय गटागट, तुकाराम आडसूळ,अर्जुन शिरसाट, प्रशांत शेळके, महादेव कौसे, महेश वाघमोडे यांनी पारिश्रम घेतले.शिक्षण विस्तार अधिकारी श्री रामनाथ कराड यांनी आभार मानले तर श्री आरिफ बेग यांनी सुत्रसंचालन केले.
Tags :
71003
10